Ladki Bahin Yojana Update:- मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जुलै 2024 मध्ये सुरू करण्यात आली होती, ज्याअंतर्गत पात्र महिलांना दरमहा 1500 रुपये आर्थिक मदत दिली जाते. मात्र, अलीकडेच राज्य सरकारने या योजनेतील लाभार्थ्यांची छाननी करून काही महिलांना अपात्र ठरवले आहे. महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, एकूण 5 लाख महिलांना अपात्र घोषित करण्यात आले आहे.
अपात्र ठरविण्यात आलेल्या महिलांची वर्गवारी पुढीलप्रमाणे आहे:
- संजय गांधी निराधार योजनेच्या लाभार्थी: 2,30,000 महिला
- वय ६५ वर्षांपेक्षा जास्त असलेल्या महिला: 1,10,000 महिला
- कुटुंबातील सदस्यांच्या नावे चारचाकी वाहन असलेल्या, नमोशक्ती योजनेच्या लाभार्थी असलेल्या आणि स्वेच्छेने योजनेतून नाव मागे घेणाऱ्या महिला: 1,60,000 महिला
या निर्णयानुसार, जानेवारी 2025 पासून या अपात्र महिलांना योजनेचा पुढील लाभ मिळणार नाही. तथापि, आतापर्यंत जमा झालेले हप्ते सरकारकडून परत मागितले जाणार नाहीत.
पात्र महिलांना योजनेचा लाभ नियमितपणे मिळत राहील. अपात्र ठरलेल्या महिलांनी अधिक माहितीसाठी स्थानिक प्रशासन कार्यालयाशी संपर्क साधावा.